Thursday, 14 February 2019

मंगेशकरांचे नवीन गोड प्रेझेंट!



प्रख्यात खवय्ये शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते नुकतेच पुण्यातील एरंडवणे येथील मिसेस बीज केकरी (Mrs B's Cakery) या नवीन केक शॉपचे उदघाटन करण्यात आले आहे. आवाजातील गोडव्याने श्रोत्यांच्या मनावर राज्य करणारं एकमेवाद्वितीय असं मंगेशकर कुटुंबिय आणि माधवी जोशी यांनी मिळून मिसेस बीज केकरी (Mrs B's Cakery) हे नवीन केक शॉप उघडून पुणेकरांच्या आयुष्यात आणखीन गोडवा आणला आहे. प्रसंगी उदघाटन सोहोळ्यास पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर, भारती मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, कृष्णा मंगेशकर, बैजनाथ मंगेशकर, माधवी जोशी यांसमवेत इतर अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

No comments:

Post a Comment